इस्लामपुर वार्ताहार :सागाव तालुका शिराळा येथील युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये खोटे व बनावट सोने तारण ठेवून पाच लाख 12 हजार रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तीन कर्जदारासमवेत सुवर्ण मूल्यांकनकार सह अशा चौघा विरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बँकेचे शाखाधिकारी अमोल कोष्टी वय वर्षे 35 राहणार पन्हाळा तालुका कडोली जिल्हा कोल्हापूर यांनी फिर्याद दिली असून साधारणपणे ही घटना 9 नोव्हेंबर 2023 ते 16 जानेवारी 2024 च्या दरम्यान घडली असून असे फिर्यादीने सांगितले