डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक सामाजिक आर्थिक या विषयावर मांडलेले विचार सर्व नागरिकांनी आत्मसात करणे आवश्यक आहे :- पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव. मिरज:- 14 मिरजवाडी नागरिक हक्क कृती समितीच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले . याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजाला शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र दिला तसेच शेतकरी कामगार दुर्बल घटकातील समाजाला मुख्य प्रवाहात आणले . त्याप्रसंगी महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुंभार याप्रसंगी बोलताना म्हणाले पर्यावरणाचे संतुलन राखणे काळाची गरज आहे मोठमोठे डीजे डॉल्बी लावण्यापेक्षा अभ्यास मंडळे उभारणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाचे प्रतीक म्हणून संबोधले जाते सर्व नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. स्वागत प्रास्ताविक शिवाजी त्रिमुखे यांनी केले सूत्रसंचालन बाळासाहेब माने. यांनी केले शेवटी आभार स्वप्निल झेंडे यांनी मांडले याप्रसंगी संदीप जगधने. सिद्धार्थ वाघमारे. शेखर मोरे. अनिल गायकवाड. प*** मोरे. सचिन जगदाळे. साहिल गायकवाड. दयानंद वायदंडे हेमंत जोसेफ. अंजीर बनसोडे. मंगल सकटे. अनिता बनसोडे .ज्योती काळे रूपाली वाघमारे. प्रमिला मोरे. चंपाबाई मोहिते परसू कांबळे परसू सौंदडे .प्रकाश पवार. मा .संपादक:- सदरवृत्त आपल्या लोकप्रसिद्ध दैनिकांमध्ये प्रसिद्धीस देऊन सहकार्य करावे ही विनंती.