सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली. त्याचवेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या इमारतीवरील ‘काँग्रेस’ या शब्दाला पांढरा रंग फासण्यात आला. विशाल पाटील यांनी आता काँग्रेससाठी, वसंतदादांच्या विचारांसाठी आणि कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानीसाठी लढावे, असे आवाहन कार्यकर्ते करीत आहेत.
महाविकास आघाडीने सांगली काँग्रेसला दिली नसल्याचे तीव्र पडसाद उमटले. जत पॅटर्न राबवण्याची कालपर्यंच चर्च होती. ती आज मिरज तालुका काँग्रेस कमिटीने मूर्त रुपात आणली. आक्रमक काँग्रेस कार्यकर्ते शुक्रवारी (ता. 12) कमिटीसमोर जमले. त्यांची बैठक झाली. त्यात जिल्हा काँग्रेसवर होत असलेल्या जाणीवपूर्वक अन्यायाचा पाढा वाचण्यात आला. वसंतदादा घराण्याची कोंडी केली जात आहे, असा आरोप करत आता बंददार फोडून आत जाण्याची वेळ आली आहे, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या लढाईसाठी मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करत असल्याची घोषणा तालुक्याध्यक्ष अण्णासाहेब कोरे य
‘काँग्रेस’वर रंग फासला
मिरज तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी ‘सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी’ या नामफलकावरील ‘काँग्रेस’ Congress या शब्दाला पांढरा रंग फासला. काँग्रेस पक्षावर आमचे प्रेम आहे, मात्र जिल्ह्यातील काँग्रेसवर अन्याय होत असताना आम्ही शांत राहू शकत नाही, अशी संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.