लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अपेक्षा आहे भारतातील तुरुणांकडे लक्ष द्या. हे देशाचं भविष्य आहे. आता फक्त १० वर्ष आहे. नंतर देश वयस्करांचा होईल, असे राज ठाकरे म्हणाले.
एक गोष्ट स्पष्टच सांगतो, एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे हे पाहत नाही रोखठोक भूमिका घेत आलो आहे, घेत राहीन. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो… आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो. येणाऱ्या लोकसभा निवडणुका देशाच भविष्य ठरवणार आहेत. महाराष्ट्रला मोठा वाटा हवा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मला अपेक्षा आहेत. महाराष्ट्रात चुकीचा कॅरम फुटला. आज मारामाऱ्या सुरु आहेत. विधानसभेच कोथळे बाहेर काढतील. माझी महाराष्ट्राकडून अपेक्षा आहे व्यभीचराला राजमान्यता देऊन नका, पुढील दिवस भीषण आहेत.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट सांगितलं. मला वाटाघाटी नको. राज्यसभा नको, लोकसभा नको. मी फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी पाठिंबा देत आहे